Profile Photo

Bhushan KulkarniOffline

    • Profile picture of Bhushan Kulkarni

      Bhushan Kulkarni

      1 year, 4 months ago

      रोजच काहीतरी नव्याने घडत राहते
      नंतर मन एखादी घटना स्मरत राहते

      चंद्रासम तो माझ्याभवती फिरत राहतो
      केवळ एकच बाजू त्याची दिसत राहते

      भजनामध्ये जेवणखाण विसरतो नवरा
      रोज दुपारी तीही डोंगर चढत राहते

      आकाशाची स्वप्ने पाहत असतानाही
      मनात का थोडीशी माती उरत राहते?

      समुद्र, डोंगर, झाडे, प्राणी, झरे पाहिले
      सगळी जनता तेच तेच का बघत राहते!

      ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो
      त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते

      ऑफिसला चालला पहा माजी खेळाडू
      मैदानावर एक नजर भिरभिरत राहते

      -भूषण कुलकर्णी

      Profile PhotoProfile Photo liked this
      1 Comment
      • “ठिपक्यांनी भरलेला कागद पुढ्यात असतो, त्यात उगा मी पूर्ण वर्तुळे करत राहते” — व्वा! 👍🏻

    Media